
Ajit Pawar AK 47 Funny : महायुतीच्या बातम्या नीट द्या...नाहीतर उडवून टाकू! दादांची फटकेबाजी
Ajit Pawar AK 47 Funny : महायुतीच्या बातम्या नीट द्या...नाहीतर उडवून टाकू! दादांची फटकेबाजी
महायुतीच्या बातम्या द्या, न्हायतर मी आणि मुख्यमंत्री तुम्हाला उडवून टाकू. अजित दादांनी एके 47 ने मीडियावर साधला निशाणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एके 47 हातात घेत, अनेकांवर निशाणा साधला. दोघांनी त्यांच्या नजरेत असणाऱ्यांवर नेम धरला. अजित दादांनी तर थेट मीडियाचे प्रतिनिधी आणि कॅमरामेनचा एके 47ने वेध घेतला. महायुतीच्या चांगल्या बातम्या द्या, अन्यथा आम्ही दोघे तुम्हा सर्वांना उडवून टाकू. अशी मिश्किल टिपणी करत अजित दादांनी मीडियावर निशाणा साधला. पुण्याच्या चाकणमध्ये आधुनिक क्षेपणास्त्र संकुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालं. त्यावेळी दोघांनी एके 47 चा अनुभव घेतला अन त्यामार्फत अनेकांवर निशाणा साधला.