Ajit Navale on Mumbai Satyacha Morcha : 'मतदार याद्यांचं काम दुसरंच कुणीतरी करतंय'
Continues below advertisement
मुंबईत मतदार याद्यांमधील (Voter Lists) कथित गोंधळाविरोधात आयोजित मोर्चात शेतकरी नेते अजित नवले (Ajit Nawale) यांनी गंभीर आरोप केले आहेत. 'निवडणूक याद्यांचं सबमिशन, लोकांना अॅड करणं आणि त्यातून डिडक्ट करणं हे कार्य दुसरंच कुणीतरी करतंय, जे कॉन्ट्रॅक्ट दिले आहेत त्याच्यामार्फत हे सगळं केलं जातंय, हा लोकशाहीसाठी अत्यंत घातक प्रकार आहे,' असं अजित नवले म्हणाले. शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या शिष्टमंडळाने निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेऊन मुंबई, ठाणे, सांगली, नाशिक येथील पुरावे सादर केले होते, मात्र त्यावर टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप नवलेंनी केला. निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुकांसाठी मतदार याद्यांमधील घोळ दूर करावा, या मागणीसाठी हा संघर्ष असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement