Rohit Pawar On MVA Morcha: पक्ष बघण्यापेक्षा आपण कुठल्या विचारासाठी कशासाठी लढत आहोत हे बघणं जास्त महत्वाचं
Continues below advertisement
मुंबईत मतदार याद्यांमधील कथित घोळ आणि मतचोरीच्या विरोधात महाविकास आघाडी (MVA) आणि मनसे (MNS) यांनी 'सत्याचा मोर्चा' आयोजित केला आहे, ज्यामध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि रोहित पवार यांच्यासारखे प्रमुख नेते सहभागी झाले आहेत. ‘ज्यांची बुद्धीचोरी झाली आहे ते मोर्चा काढत आहेत,’ या जयकुमार गोरेंच्या टीकेला उत्तर देताना रोहित पवारांनी, 'स्वतःच्या काळ्या आणि उघड्या इतिहासाबद्दल त्यांनी थोडासा विचार करावा,' असा सणसणीत टोला लगावला आहे. येणाऱ्या अधिवेशनात गोरेंबद्दल अधिक बोलणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. या मोर्चात काँग्रेसच्या सहभागाविषयी प्रश्नचिन्ह असताना, पवारांनी मनसेला आघाडीत घेण्यासाठी 'कॉमन मिनिमम प्रोग्राम'ची अट ठेवली आहे, ज्यामुळे भविष्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement