Ajit Gavhane To Join Sharad Pawar : अजितदादा गटाचे शहराध्यक्ष शरद पवार गटात प्रवेश करणार

Continues below advertisement

पमुख्यमंत्री अजित पवारांना बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये मोठा धक्का बसलेला आहे. शहराध्यक्ष अजित गव्हाणे, कार्याध्यक्ष राहुल भोसले, भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर आणि युवक अध्यक्ष यश सानेंनी राजीनामे दिलेत. प्रदेश कार्यालयात हे राजीनामे सोपविल्याची माहिती गव्हाणेंनी दिली आहे. या चौघांसह माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी फुंकणार आहेत. येत्या 20 जुलैला पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. शरद पवारांनी अजित पवारांना दिलेला हा मोठा धक्का मानला जातोय. मात्र माजी आमदार विलास लांडेंच्या प्रवेशाबाबत अद्याप अनिश्चितता आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram