Ajay Baraskar : Gunaratna Sadavarte मराठा समाजाचे द्वेशी, अजय बारसकर यांचा हल्लाबोल
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAjay Baraskar on Manoj Jarange Patil : मराठा आरक्षण मिळावं यासंदर्भात आमची भूमिका असून जरांगे यांच्या आंदोलनामुळे मराठा आरक्षण मिळालं. मात्र, त्यांच्या अंतर्गत दुर्गुणामुळे मराठा आरक्षणाला तडा गेला, अशी टीका अजय बारसकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केली. बारसकर यांनी मराठा आरक्षणासाठी लढत असल्याचे म्हटले आहे.
सदावर्ते हे मराठा द्वेषी आहेत
ते म्हणाले की, गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात देखील आम्ही लढलो आहे. त्यांचं म्हणणं आहे खुल्या प्रवर्गावर अन्याय होतो. मात्र, त्यांना कोणी वकीलपत्र दिलेलं नाही. एकीकडे गुणरत्न सदावर्ते आणि दुसरीकडे कोटी मराठे आहेत. गुणरत्न सदावर्तेंविरेधातील लढाई आम्ही सुरु ठेवणार आहे. सदावर्ते हे मराठा द्वेषी आहेत काहीही प्रश्न आला की खुल्या प्रवर्गावर अन्याय होतो असं म्हणतात. त्यांना कोणी वकीलपत्र दिली आहे का? एकट्या माणसाने आरक्षण रद्द केलं आहे, आरक्षणाचं रक्षण केलं पाहिजे होतं. कायदेशीर मुद्यांवर आपण लढले पाहिजे. आमची हयात फडणवीस यांच्याविरोधात गेली मग आम्ही सरकारचा माणूस कसा? मी मराठा समाजाचा माणूस आहे, अशात मला जीवे मारण्याची धमकी दिली तरी जनजागृती मी करणार आहे, असेही ते म्हणाले.