Ajay Baraskar:अजय महाराज बारस्कर सागर बंगल्याबाहेर; फडणवीसांची भेट न झाल्याने ठिय्या,पोलिसांनी उचललं
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAjay Baraskar:अजय महाराज बारस्कर सागर बंगल्याबाहेर; फडणवीसांची भेट न झाल्याने ठिय्या,पोलिसांनी उचललं
मुंबई : राज्यातील आरक्षणाचा तिढा काही केल्या सुटताना दिसत नाही, दुसरीकडे उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) हे सगे-सोयरे आणि ओबीसीतून मराठा आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत. तर, शासनस्तरावर सगेसोयरेसंदर्भाने लवकरच अंमलबजावणी होईल, असेही सांगण्यात येत आहे. मात्र, आरक्षणाचा हा गुंता राज्यातील सर्वात जटील प्रश्न बनला आहे. त्यातच, काही महिन्यांपूर्वी उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप करणारे अजय महाराज बारस्कर (Ajay Baraskar) यांची गाडी जाळण्यात आल्यानंतर आता बारस्कर आक्रमक झाले असून ते थेट सागर बंगल्यावर पोहोचले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सागर बंगल्याबाहेरच त्यांनी आपला ठिय्या घातला असून आंदोलन सुरू केल्याचं दिसून येत आहे. देवेंद्र फडणवीस यांची भेट न झाल्यामुळे ते सागर बंगल्याबाहेरील ओसरीवर बसले होते, आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.