Ajay Baraskar on Manoj Jarange | जरांगेंबाबत भूमिका मांडल्यापासून मला धमक्या येत आहेत - अजय बारस्कर
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAjay Baraskar on Manoj Jarange | जरांगेंबाबत भूमिका मांडल्यापासून मला धमक्या येत आहेत - अजय बारस्कर
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांना विरोध करणारे अजय बारस्कर यांना अज्ञात इसमांकडून येणाऱ्या धमकीबाबत त्यांनी आज अहमदनगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात दखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे... मनोज जरांगे पाटील यांच्या विषयी जी भूमिका मांडली तेव्हापासून आजपर्यंत अज्ञात इसमांकडून धमक्या येत असल्याचं बारस्कर यांनी म्हटलय...दरम्यान आपण लवकरच मराठवाड्यात जाऊन उपोषण करणार असल्याचा इशारा देखील बारस्कर यांनी दिला आहे...सोबतच जरांगे यांचे जे कायदेशीर सल्लागार आहेत, त्यांनी माझ्यासमोर येऊन खुली चर्चा करावी असा आव्हान त्यांनी जरांगे यांना दिले आहे...तसेच जरांगे यांच्या आंदोलनामुळे कोट्यवधी मराठा बांधवांना कुणबी प्रमाणापत्र मिळाले असल्याचे जरांगे सांगतात पण ते खोटं आहे असा दावा देखील बारस्कर यांनी केलाय