Zero Hour: 'जाती-धर्मात तेढ सरकार स्पॉन्सर्ड आहे', एमआयएमचे Imtiaz Jaleel यांचा गंभीर आरोप
Continues below advertisement
एमआयएमचे (MIM) माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी 'झिरो आवर' या कार्यक्रमात बोलताना राज्यातील देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या सरकारवर जोरदार टीका केली आहे. 'या राज्यामध्ये ज्या प्रकारे जाती, धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे आणि ते कोण करत आहे, ते सगळं सरकार स्पॉन्सर्ड आहे,' असा थेट आरोप इम्तियाज जलील यांनी केला आहे. त्यांनी पुढे सांगितले की, महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची संख्या वाढत आहे. २०२३ मध्ये ४,१५१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, तर २०२४ मध्ये हा आकडा २,७०६ होता आणि २०२५ च्या पहिल्या तीन महिन्यांत ७८० शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले. सरकारने जाहीर केलेले ₹३१,६२८ कोटींचे पॅकेज हे केवळ दिखावा असून, त्यातून शेतकऱ्यांच्या हातात थेट काहीही पडणार नाही, असा दावाही जलील यांनी केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्ष पैसे आणि जातीय राजकारणाचा वापर करतील, असेही ते म्हणाले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement