Gun License Row : 'गुन्हेगारांना राजाश्रय देणाऱ्यांना सोडणार नाही', मुख्यमंत्री Fadnavis यांचा थेट इशारा

Continues below advertisement
पुण्यातील सचिन घाईवळ (Sachin Ghaiwal) शस्त्र परवाना (Arms License) प्रकरणावरून राजकारण तापले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी गुन्हेगारीविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. 'कोणाचा काही पास्ट असो पण आत्ता जर कोणी गुन्हेगारीमध्ये जात असेल किंवा गुन्हेगारीत आढळेल तर त्याला आम्ही सोडणार नाही,' असा थेट इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला आहे. सचिन घाईवळला शस्त्र परवाना दिलाच नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले असून, गृहराज्यमंत्र्यांनी केवळ सुनावणी घेतली होती, मात्र पोलिस आयुक्तांनी वस्तुस्थिती समोर आणल्यानंतर परवाना दिला गेला नाही, असे त्यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, अजित पवारांनीही नियमांनुसार दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आणि यात कोणताही राजकीय हस्तक्षेप सहन न करण्याचे आश्वासन दिले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola