Ahmednagar, | इतिहासाच्या पाऊलखुणा! जामखेडच्या सुलतान दुर्ग किल्ल्यात सापडले 250 तोफगोळे
Continues below advertisement
अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड तालुक्यातील खर्डा येथे असलेल्या सुलतान दुर्ग किल्ल्यामध्ये तब्बल 250 तोफगोळे आणि तोफेचा फुटलेला भाग आढळून आला आहे.
खर्डा येथे 1795 साली मराठ्यांनी निजामशाही पराभूत करून विजय मिळवल्याने या किल्ल्याला मोठा इतिहास आहे. जामखेड तालुक्यातील खर्डा येथे 1795 साली मोठी लढाई झाली होती. या लढाईत मराठ्यांनी निजामशाही पराभूत करुन विजय प्राप्त केला.
आजही खर्डा भागात अनेक ठिकाणी युध्दाच्या खुणा सापडत आहेत. रणटेकडी दौडवाडी येथून युध्दाची तयारी आखली जात होती. तेथे ही टेकडी रणांगणाची साक्ष देत उभी आहे.
ही लढाई पाणीपतनंतर विजयाची शौर्य गाथा ठरली होती. आजही अनेक खर्डा शहराच्या जवळपास पुरातन वास्तु इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत.
सुलतान दुर्ग किल्ल्याची दुरावस्था झाल्याने पुरातत्व विभागाने किल्ल्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आणि हे काम सुरू असताना खोदकाम करताना 250 तोफगोळे आणि तोफेचा फुटलेला भाग आढळून आला.
यापूर्वी देखील येथील शेतकऱ्यांना शेती काम करताना जुन्या तलवारी, ढाल आणि काही तोफगोळे देखील सापडले होते. मात्र आता तब्बल 250 तोफगोळे सापडल्याने या सर्व वस्तूंचे पर्यटकांसाठी किल्ल्यातच पुन्हा जतन करून ठेवावे अशी मागणी शिवप्रेमी करत आहेत.