Ahmednagar Hindu Muslim Conversion : लेकीचा जीव वाचवण्यासाठी धर्मांतर, शिवराम पुन्हा होणार जमीर शेख

Continues below advertisement

गेल्या वर्षी छत्रपती संभाजी नगर येथे एका मोठ्या सोहळ्यात धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर धाम महाराज यांच्या उपस्थितीत अहमदनगर येथील एका संपूर्ण मुस्लिम कुटुंबाने हिंदू कुटुंबात प्रवेश केला होता मात्र दीक्षा घेतल्यानंतर किंवा धर्मांतर केल्यानंतर केवळ 215 दिवसातच हे संपूर्ण कुटुंब पुन्हा मुस्लिम धर्मामध्ये प्रवेश करण्याच्या मानसिकतेत आहे आणि त्याचं कारण ठरलं आहे पूर्वीचे जमीर शेख आणि आत्ताचे शिवराम आर्य यांची आठ वर्षांची मुलगी आशिया शेख उर्फ अश्विनी आर्य.... अश्विनी आर्य हिच्या मेंदूमध्ये गाठ झाल्याने तिच्यावरती एक शस्त्रक्रिया करण्यात आली आहे मात्र दुसरी शस्त्रक्रिया करण्यासाठी जवळपास साडेचार लाख रुपये खर्च येणार आहे मात्र शिवराम आर्य यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने त्यांच्यासमोर मुलीची शस्त्रक्रिया कशी करावी असा प्रश्न आहे त्यांनी काही हिंदू सहकाऱ्यांना आर्थिक मदत मागितली मात्र त्यांना ती होऊ शकली नाही तर त्यांच्या कागदपत्रांवर काही ठिकाणी मुस्लिम नाव आहे तर काही ठिकाणी हिंदू नाव आहे त्यामुळे त्यांना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ देखील घेता येत नाहीये त्यामुळे त्यांची कोंडी झाली असून जर आपण पुन्हा मुस्लिम धर्मात प्रवेश केला तर निदान आपल्या रक्ताचे नातेवाईक आपल्या मदतीला येतील अशी त्यांना अपेक्षा आहे आणि म्हणून येत्या बकरी ईद च्या दिवशी आपण मुस्लिम धर्मामध्ये प्रवेश करण्याच्या मानसिकतेत असल्याचं त्यांनी म्हटलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram