Ahmednagar Hospital Fire : आग दुर्घटनेप्रकरणी सरकारकडून चौकशीचे आदेश, 5 लाख रुपयांची मदत ही जाहीर

Fire Breaks Out at Hospital in Ahmednagar : ऐन दिवाळीत अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयूममध्ये भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये होरपळून काही जणांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आयसीयूमध्ये 20 जण उपचार घेत होते. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. आगीची माहिती मिळताच अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे तातडीने रवाना झाले आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयाला लागलेल्या आगीत काही जणांचा मृत्यू झाल्याची हसन मुश्रीफ यांनीही माहिती दिली आहे. मृताचा अद्याप आकडा समोर आलेला नाही. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola