Ahmadnagar : ...तर कोरोनाची तिसरी लाट अहमदनगरमधून ; विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचा इशारा
नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे गेल्या दोन दिवसापासून अहमदनगर जिल्हयाच्या दौऱयांवर असून अहमदनगर जिल्ह्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यांनी जिल्ह्यातील हॉटस्पॉट असलेल्या संगमनेर आणि पारनेर तालुक्याचा दौरा केला असून अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांना कोरोना नियमांचा विसर पडला।असलायच स्पष्ट केलंय. जिल्ह्यातील अनेक भागात दहावा, लग्न सोहळे मोठया प्रमाणात तर रस्त्यांवर मोठी गर्दी होत असून नागरिकांनी दक्षता न घेतल्यास अहमदनगर जिल्ह्यातून कोरोनाची तिसरी लाट सुरू होऊ शकते अशी भीती व्यक्त केली आहे. तसेच नियम न पाळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले असलायची माहिती दिली.