Amravati Violence : राज्यात झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी जमावबंदीचे आदेश...
राज्यात झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभुुमीवर अनेक ठिकाणी जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं 30 नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी आणि शस्त्रबंदीचे आदेश देण्यात आलेत. शहरातील शांततेला आणि सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये यासाठी असे आदेश देण्यात आल्याचं प्रशासनानं म्हटलंय. चंद्रपूर जिल्ह्यात हा आदेश लागू करण्यात आला आहे. वैद्यकीय कारणाशिवाय कोणालाही घराबाहेर न पडण्याचे आदेश पोलिसांकडून देण्यात आलेत.