Gondia 'Majha' Impact: 'माझा'च्या बातमीनंतर प्रकल्पग्रस्तांना मदत, 106 कुटुंबीयांना मिळणार मदत

Continues below advertisement

एबीपी माझाच्या बातमीमुळे बिरशी गावातील १०६ कुटुंबीयांना मालकीचे भूखंडं मिळणार आहेत.. बिरशी विमानतळासाठी १०६ कुटुंबीयांनी आपली जागा शेती आणि घरे दिली होती.. मात्र या प्रकल्पग्रस्तांना अद्याप मोबदला मिळाला नव्हता.. याविरोधात प्रकल्पग्रस्तांनी विमानतळाच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर असलेल्या १६ एकर जागेवर अतिक्रमण केलं होतं.. ही बातमी एबीपी माझाने दाखवल्यानंतर जिल्हा प्रशासनाला जाग आलीय. खासदार सुनील मेंढे यांनी जिल्हाधिकऱ्यांसोबत बैठक घेत तोडगा काढण्याच्या सूचना दिल्यात.. त्यानंतर जिल्हा प्रशासनानं घरे बांधण्यासाठी भूखंड देण्याचं ठरवलंय. आज  उपविभागीय अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांसह जागेची पाहणी केलीय.. घरांसाठी जागा मिळत असल्याने प्रकल्पाग्रस्तांनी माझाचे आभार मानलेत.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram