Cyrus Mistry यांच्या कार अपघातानंतर महामार्ग प्राधिकरणाला जाग, अपघाताच्या ठिकाणी अनेक उपाययोजना
प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा कार अपघातात मृत्यू झाल्यानंतर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला जाग आली असून मुंबई आमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सुरक्षा उपाययोजना करायला सुरुवात केली आहे ज्या ठिकाणी सायरस मिस्त्री यांचा अपघात घडला त्या ठिकाणी आत्ता क्रॅश कुशन बसवण्यात आलं असून या महामार्गावर प्रथमच अशी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अछाड ते घोडबंदर पर्यंत जवळपास 29 ब्लॅक स्पॉट असून सर्वच ठिकाणी वेगवेगळ्या सुरक्षा उपाययोजना करायला सुरुवात केली आहे यामध्ये प्रामुख्याने सिग्नल यंत्रणा दोन लेनच्या मध्ये अनधिकृत असलेले कट बंद करणे, त्याचप्रमाणे सूचना देणारे फलक अशा उपाययोजना करण्यात येत आहे .