प्रतिक्षा संपली! 2 वर्षांनंतर डोंबिवलीचा कोपर पूल खुला होणार,उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
Continues below advertisement
डोंबिवली पूर्व पश्चिमेला जोडणारा कोपर उड्डाण पूल धोकादायक झाल्यामुळे 15 सप्टेंबर 2019 पासून वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता. या पुलावरील वाहतूक ठाकुर्ली उड्डाणपुलावरून वळविण्यात आली होती. मात्र हा पूल अरुंद असल्याने शहरातील अंतर्गत रस्त्यावर वाहतूक कोंडीचा ताण येत होता. यामुळे कोपर पुलाचे काम लवकर मार्गी लावावे अशी मागणी वारंवार होत होती.केडीएमसिकडून जुना पूल तोडून नवीन पुलाच्या कामास सुरू करण्यात आली.
Continues below advertisement