अफगाण विद्यार्थी Aditya Thackeray यांच्या भेटीला,नातेवाईक संपर्काबाहेर असल्याने विद्यार्थी हवालदिल
काबुल : अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यानंतर तेथील परिस्थिती काही भयावह बनत आहे, हे दाखवणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. नागरिक देश सोडून जाण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. मिळेल त्या मार्गाने नागरिकांना देशातून म्हणजेच तालिबान्यांच्या तावडीतून बाहेर पडायचं आहे. रस्त्यांवर लोकांची गर्दी आहे. विमानतळावर विमानांच्या अवतीभोवती नागरिकांना गर्दी केलीय. अशातच विमानाला लटकून प्रवास करण्याच्या प्रयत्नात हवेतून खाली पडून काही जणांना मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.