Adventure Tourism: 'भूदरगड आता देशाच्या पर्यटन नकाशावर येईल', पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा विश्वास
Continues below advertisement
कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक भूदरगड किल्ल्यावर साहसी खेळांचे (Adventure Sports) लोकार्पण करण्यात आले. पालकमंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांच्या हस्ते पॅरामोटरिंग, पॅराग्लायडिंग, वॉटर बोटींग आणि कायाकिंग या खेळांचा शुभारंभ झाला. 'आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्या पद्धतीने साहसी खेळांचे एक नवीन लोकार्पण आपण या ठिकाणी करतोय, पर्यटनाची एक नवीन संधी लोकांच्यासाठी उपलब्ध करून देतोय,' असे मत आबिटकर यांनी व्यक्त केले. या उपक्रमामुळे स्थानिक पर्यटनाला मोठी चालना मिळेल आणि भूदरगड किल्ला देशाच्या पर्यटन नकाशावर ओळखला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्वतः पॅरामोटरिंगचा अनुभव घेतला. दुधगंगा नदीच्या पात्रात पर्यटकांसाठी बोटींगची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली असून, या डेव्हलपमेंटमुळे देशभरातील पर्यटक आकर्षित होतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement