ST Reservation Row Wardha : वर्ध्यात 4 नोव्हेंबरला आदिवासी बांधवांचा महाआक्रोश मोर्चा
Continues below advertisement
वर्ध्यामध्ये (Wardha) 4 नोव्हेंबर रोजी आदिवासी समाजाच्या (Adivasi Community) वतीने 'महा आक्रोश मोर्चाचे' आयोजन करण्यात आले आहे. बंजारा समाजाला (Banjara Community) अनुसूचित जमातीमध्ये (ST) समाविष्ट करण्याच्या मागणीला विरोध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. 'या गॅजेटमधल्या नोंदींचा उल्लेख करून जर कोणी मागणी करत असेल तर ती अवास्तव आणि असंवैधानिक आहे, म्हणून त्या मागणीचा सरकारनं विचार करू नये,' असा थेट इशारा आयोजकांनी दिला आहे. हा मोर्चा वर्ध्यातील जुन्या आरटीओ मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढला जाणार आहे. राज्यातील विविध आदिवासी संघटनांनी एकत्र येऊन या मोर्चाचे आयोजन केले असून, बंजारा समाजाच्या मागणीमुळे आदिवासींच्या हक्कांवर गदा येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पत्रकार परिषदेद्वारे आयोजकांनी सर्व आदिवासी बांधवांना मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement