BJP Mission Worli : भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात
BJP Mission Worli : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपाच्या वतीने तयारीला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. तेजस्वी सूर्या यांच्या नेतृत्वात आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात युवा मोर्चाची शाखा उघडली जाणार आहे. सकाळी ११ वाजता तेजस्वी सूर्य आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात असतील. त्यामुळे पुन्हा एकदा वरळी मतदारसंघात भाजप विरुद्ध उद्धव ठाकरे यांची शिवसेना असा वाद रंगेल