Aditya Thackeray Konkan tour : आदित्य ठाकरे दोन दिवस कोकण दौऱ्यावर, पदाधिकाऱ्यांसोबत घेणार खळा बैठक
आदित्य ठाकरे आजपासून दोन दिवस कोकण दौऱ्यावर आहेत. काल रात्रीच ते कोकण दौऱ्यासाठी रवाना झालेत... ठाकरे गटाची ताकद वाढवण्यासाठी तळागाळातील कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत. त्यासाठी ते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत खळा बैठक घेणार आहेत. या दौऱ्यात आदित्य ठाकरे रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात बैठका घेणार आहेत.