Aditya Thackeray at Sangola : आदित्य ठाकरे यांचा Shahajibapu Patil यांंच्या मतदारसंघात दौरा
Continues below advertisement
५० खोक्यांच्या टीकेवर कायदेशीर कारवाईचा इशारा शिंदे गटानं दिलाय. तर आदित्य ठाकरेंनी ५० खोक्यांवरून टीका सुरुच ठेवलीय. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे आज शिंदे समर्थक आमदार शहाजीबापू पाटलांच्या सांगोला मतदारसंघात जाणार आहेत. सांगोल्यातील संगेवाडी आणि मांजरी इथं ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. महाराष्ट्राच्या सत्तांतराच्यावेळी डोंगर, झाडी, हाटिल, सगळं ओक्के या डायलॉगमुळे शहाजीबापू पाटील राज्यभरात प्रसिद्ध झाले. गेले काही दिवस त्यांनी आदित्य ठाकरेंनाही टीकेचं लक्ष्य केलंय. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांचा शहाजीबापूंच्या मतदारसंघातील दौरा लक्षवेधी ठरणार आहे.
Continues below advertisement