Dharavi Slum Development : धारावी परिसराच्या पुर्नविकासाची बोली अदानी समुहाने जिंकली : ABP Majha

Continues below advertisement

आशिया खंडातील एक मोठी झोपडपट्टी असलेल्या आणि मुंबईत अतिशय मोक्याच्या ठिकाणी असलेल्या धारावीचा पुनर्विकास आता अदानी समूह करणार आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी राज्य सरकारनं नव्यानं काढलेल्या निविदा प्रक्रियेत अदानी समूहानं बाजी मारली आहे. धारावीत जवळजवळ ५८ हजार कुटुंबांच्या वस्तीला लागूनच १२ हजार लघुउद्योग दाटीवाटीनं उभे आहेत. धारावी पुनर्विकासासाठी अदानी समूहासह डीएलएफ आणि नमन समूहानंही निविदा दाखल केली होती. त्यापैकी नमन समूहाची निविदा तांत्रिक मुद्यावर बाद करण्यात आली. अदानी समूहानं निविदेत पाच हजार ६९ कोटी रुपयांची बोली लावली होती. डीएलएफ कंपनीनं दोन हजार २५ कोटी रुपयांची बोली लावली होती. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram