Maharashtra Politics ...तर तात्या विंचू तुम्हाला चावेल, Mahesh Kothare यांना Sanjay Raut यांचा टोला
Continues below advertisement
ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे (Mahesh Kothare) यांनी आपण पंतप्रधान मोदी आणि भाजपचे (BJP) भक्त असल्याची कबुली दिल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. ‘...तर तात्या विंचू तुम्हाला चावेल, रात्री येऊन तुमचा गळा दाबेल’, असा टोला शिवसेना (UBT) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला आहे. कोठारे यांनी आपले चित्रपट केवळ भाजपच्या लोकांनी पाहिले नाहीत, याची आठवणही राऊत यांनी करून दिली. राऊत यांच्या टीकेला भाजप नेत्यांनीही प्रत्युत्तर दिले असून, यावरून राजकीय वाद सुरू झाला आहे. महेश कोठारे यांनी मुंबईतील एका दिवाळी पहाट कार्यक्रमात बोलताना आपण भाजप आणि पंतप्रधान मोदींचे भक्त असून मुंबईत भाजपचाच महापौर होईल, असे विधान केले होते. या संपूर्ण प्रकरणावर महेश कोठारे यांनी एबीपी माझाशी बोलताना आपली भूमिका मांडली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement