Mahesh Kothare : महेश कोठारेंच्या 'त्या' वक्तव्याचे राजकीय पडसाद; Sanjay Raut यांचा खोचक टोला

Continues below advertisement
ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे (Mahesh Kothare) यांनी भाजपच्या (BJP) दिवाळी पहाट कार्यक्रमात स्वतःला पंतप्रधान मोदींचा (PM Modi) भक्त म्हणवल्याने राजकीय वाद निर्माण झाला आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी, 'तुम्ही असं काही बोललात तर तात्या विंचू तुम्हाला चावेल, रात्री येऊन तुमचा गळा दाबेल', अशी खोचक टीका केली आहे. कोठारे यांनी मुंबईत कमळ फुलेल, म्हणजेच भाजपचा महापौर होईल, असा विश्वास व्यक्त केला होता. यावर राऊत म्हणाले की कलाकारांचे चित्रपट केवळ भाजपचे लोक पाहत नाहीत. राऊतांच्या टीकेला उत्तर देताना भाजपचे माध्यम प्रभारी नवनाथ बन (Navnath Ban) म्हणाले की, 'तात्या विंचू तुमचा विलन आहे आणि आमचे हिरो महेश कोठारे आहेत'.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola