Maharashtra Politics: 'मी मोदीजींचा भक्त आहे', Mahesh Kothare यांची कबुली; म्हणाले, 'मुंबईवर कमळ फुलणार'.
Continues below advertisement
ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक-अभिनेते महेश कोठारे (Mahesh Kothare) यांनी भाजपला (BJP) पाठिंबा जाहीर केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे, ज्यावर शिवसेना (UBT) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका केली आहे. कोठारे यांनी जाहीरपणे म्हटले, 'मी जरा सुद्धा भाजप चा भक्त आहे मी मोदीजींचा भक्त आहे'. कोठारे यांनी २०२५ च्या दिवाळीपर्यंत मुंबईवर कमळ फुलेल, असा विश्वासही व्यक्त केला. यावर संजय राऊत यांनी कोठारे यांच्या 'झपाटलेला' चित्रपटातील 'तात्या विंचू' या पात्राचा उल्लेख करत, 'तुमचे चित्रपट फक्त भाजपच्या लोकांनी बघितलेले नाहीत', असा टोला लगावला. या टीकेला उत्तर देताना भाजपचे नवनाथ बन म्हणाले की, 'हिरो आमच्या सोबत आहेत आणि व्हिलन तुमच्या सोबत आहेत'. या सर्व घडामोडींवर, हे आपले वैयक्तिक मत असून, मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, अशी प्रतिक्रिया महेश कोठारे यांनी एबीपी माझाला दिली.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement