Monsson Back Mumbai: ऐन दिवाळीत पावसाची हजेरी, नागरिक हैराण, मुंबई, ठाणे, नवी मुंबईत नागरिकांची धावपळ
Continues below advertisement
ऐन दिवाळी आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी महाराष्ट्रातील अनेक शहरांना अवकाळी पावसाने झोडपून काढले. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, कोल्हापूर, रायगड, परभणी आणि वाशिम यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. 'येत्या काही दिवसात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यांनी देखील वर्तवली आहे,' या अंदाजामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. कल्याणच्या अनुपम नगरमध्ये एका घरावर झाड कोसळून दोघे जण जखमी झाले आणि त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे कंदील आणि दुकानांचे नुकसान झाले, तर सखल भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. या पावसामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांचा आणि रस्त्यावरील विक्रेत्यांचा मोठा खोळंबा झाला.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement