Bikramjeet Kanwarpal : अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचं कोरोनामुळे निधन

मुंबई : भारतीय लष्करातून मेजर पदावरून निवृत्त झालेले आणि नंतर अभिनय क्षेत्रात आलेले अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. कोरोना झाल्यानंतर त्यांना गेल्या दोन आठवड्यापूर्वी सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. ते 54 वर्षांचे होते. कसम, मर्डर 2, पेज 3, आरक्षण, हेट स्टोरी अशा अनेक मालिका-चित्रपटांत त्यांनी अभिनय केला होता. 

बिक्रमजीत कंवरपाल  हे अभिनेते तर होतेच. पण त्यापूर्वी ते सैन्यामध्ये कार्यरत होते. काही काळ सैन्यात घालवल्यानंतर त्यांनी तिथून निवृत्ती घेतली होती आणि ते अभिनयाकडे वळले होते. 2003 पर्यंत ते सैन्यात होते. सिनेमा, मालिका आणि वेबसीरीज अशा तीनही व्यासपीठांमधून ते काम करत होते. स्पेशल ऑप्स, श्रीकांत बशीर आदी अनेक वेबसीरीजमध्ये ते झळकले होते. शिवाय, साहो, पेज 3, गाझी अटॅक, 2 स्टेट्स, पाप, हिरोईन, कार्पोरेट आदी अनेक चित्रपटांमध्ये ते झळकले होते. आगामी भौकाल या वेबसीरीजच्या दुसऱ्या सीझनमध्ये त्यांची महत्वाची भूमिका होती. अभिनय करतानाच सैन्याचा गाढा अनुभव असल्यामुळे इतर अभिनेत्यांना अभिनयासाठी सैनिकी प्रशिक्षण देण्यासाठीही कंवरपाल यांना पाचारण करण्यात येत असे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola