Mumbai : आवश्यक वाटल्यास आजच राज ठाकरेंवर कारवाई होईल, पोलीस महासंचालकांची माहिती
Mumbai : "राज ठाकरे यांच्या भाषणाबाबत औरंगाबादचे पोलीस आयुक्त तपास करुन आवश्यक कारवाई आजच करतील. कारवाई करण्यासाठी ते सक्षम आहेत. त्याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे," अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी दिली. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबतच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सेठ बोलत होते. राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडू नये यासाठी महाराष्ट्र पोलीस दल सज्ज असल्याचंही त्यांनी सांगितलं.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv