Ramdas Kadam and Adsul : उद्धव ठाकरेंकडून कारवाई, शिंदेंकडून नवी जबाबदारी ABP Majha
शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलीए....आज सकाळी रामदास कदम यांनी शिवसेनेतून नेतेपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केलीए.... आनंदराव अडसूळ आणि रामदास कदम यांच्या हकालपट्टीचं पत्रक शिवसेनेकडून जारी करण्यात आलंय.. उद्धव ठाकरेंची या पत्रकावर सही आहे... दरम्यान आज रामदास कदम यांनी शिवसेनेतून राजीनामा दिलाय.... बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर नेतेपदाला काहीच अर्थ नाही, असं राजीनामा देताना कदम यांनी म्हटलंय. पक्षाविरोधी कारवायांमुळे शिवसेनेनं कदम आणि अडसूळांची हकालपट्टी केलीए
Tags :
Shiv Sena Uddhav Thackeray Ramdas Kadam Anandrao Adsul Former Minister Expulsion From Shiv Sena Resignation As Leader Anti-Party Activities