TET Exam Fraud : 2019 च्या शिक्षक भरती घोटाळाप्रकरणी अखेर कारवाई ABP Majha

Continues below advertisement

२०१९ साली झालेल्या शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी अखेर कारवाई करण्यात आलेय... टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेत ७८८० विद्यार्थी बोगस पद्धतीनं उत्तीर्ण झाल्याचं पुणे सायबर पोलिसांच्या तपासात समोर आलंय... या सर्व विद्यार्थ्यांना अपात्र ठरवण्यात आलंय... तसंच त्यांच्या नावाची यादीही पोलिसांनी जाहीर केलेली आहे... या सर्व अपात्र उमेदवारांना यापुढेही टीईटी देण्यात मनाई करण्यात आले... अशा बोगस पद्धतीनं पात्र ठरत अनेक जण सध्या राज्यात विविध ठिकाणी शिक्षकाची नोकरी करत आहेत... अशांचा शोध घेऊन त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात येणार आहे... हा घोटाळा उघड झाल्यानंतर आता २०१३ पासून टीईटीमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्वांची प्रमाणपत्र तपासण्यात येणार आहेत... या प्रकरणी पोलिसांनी शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष तुकाराम सुपे,  माजी आयुक्त सुखदेव ढेरे यासह जी ए टेक्नॉलॉजीच्या प्रितेश देशमुख यांना अटक केली आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram