Asha Workers : राज्यातील आशा वर्कर्सचा संप मिटला, आरोग्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत अखेर तोडगा
Continues below advertisement
मुंबई : राज्यातील आशा वर्कर्स (Accredited Social Health Activist) चा संप अखेर मिटला आहे. गेल्या दोन दिवसांपासून आशा वर्कर्स संघटनेचे पदाधिकारी आणि आरोग्यमंत्र्यांमध्ये झालेल्या चर्चेला यश आलं आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भातील घोषणा केली आहे. कोरोना काळात सेवाभत्ता वाढवून मिळावा, या मागणीसाठी आशा वर्कर्स संपावर गेलेल्या होत्या. याशिवाय त्यांच्या इतरही काही मागण्या होत्या. पण अखेर हा संप मिटलेला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
Continues below advertisement