Akkalkot मधून Solapurला जाणा-या जीपचा भीषण अपघात ABP Majha
आफताब शेख, एबीपी माझा
Updated at:
16 Nov 2021 12:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्वामी समर्थांचं दर्शन घेऊन अक्कलकोटवरुन सोलापूरला जाणाऱ्या जीपचा टायर फुटल्यामुळे भीषण अपघात झालाय. या अपघातांमध्ये पाच जणांचा मृत्यू झालाय. मृतांची नावे अद्याप अस्पष्ट आहेत. या अपघातामध्ये पाच ते सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात आणण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. कुंभारी जवळील गंगाप्रसाद पेट्रोलपंप समोर ही घटना घडली. एसटी बंद असल्याने सर्वजण सोलापूरकडे खासगी जीपने प्रवास करत होते, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. वळसंग पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून मदत पोहचवली जात आहे.