Vande Mataram Mandate: 'भारत में रहना होगा तो वंदे मातरम् कहना होगा', Abu Azmiं विरोधात भाजप आक्रमक

Continues below advertisement
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांनी वंदे मातरम् (Vande Mataram) गीतावरून केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. 'नफरत फैलावा और इस तरह के मुद्दे लाना... जैसे शेर के मुँह में खून लग जाता है ना, तो हमेशा खून ही ढूंढता है,' अशा शब्दात आझमी यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. वंदे मातरम् गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, महाराष्ट्र सरकारने ३१ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर दरम्यान शाळांमध्ये संपूर्ण गीत गाण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयाला विरोध करताना आझमी यांनी म्हटले की, मुस्लिमांना वंदे मातरम् म्हणायला भाग पाडणे चुकीचे आहे. यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून, 'भारतात राहायचे असेल तर वंदे मातरम् म्हणावे लागेल' असा इशारा दिला आहे. तसेच, आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली जात आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola