ABP Majha Headlines : 6 PM : 2 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
जागावाटपात अधिकच्या १० जागा मिळण्यासाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीचा अमित शाहांच्या मागे लकडा...प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी शाहांची दोनदा भेट घेतल्याची माहिती...
निलेश राणेंना कुडाळ-मालवणमधून उमेदवारीसाठी नारायण राणेंची वर्षावर एकनाथ शिंदेंसोबत बैठक... मुख्यमंत्री करणार उदय सामंतांशी चर्चा..
शेतकऱ्यांच्या लग्नाची व्यथा मांडताना आमदार देवेंद्र भुयारांची मुक्ताफळे... म्हणाले चांगल्या मुली नोकरदारांना तर शेतकऱ्यांना तीन नंबरचा गाळ..
महिला उपभोगाचं साधन आहे का, भुयारांच्या वक्तव्यावरुन यशोमती ठाकूर यांचा संतप्त सवाल, तर भुयारांना महिलांची माफी मागायला सांगेन, चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया
चंद्रपुरात शिक्षक असलेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्याचा शाळकरी मुलीवर अत्याचार, पॉक्सोअंतर्गत युवक काँग्रेसच्या शहराध्यक्षावर गुन्हा दाखल, पक्षातूनही हकालपट्टी...
महाराष्ट्रात वाचाळवीरांचा सुळसुळाट, महात्मा गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरेंची भावनिक पोस्ट, गांधींचा विचार पुसणं अशक्य असल्याची प्रांजळ भूमिका
महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त इंडी आघाडीचा लाॅन्ग मार्च.. वर्षा गायकवाड, भाई जगतापांसह अनेक मोठे नेते पदयात्रेत सहभागी...
विसर्जन करण्याची गांधींची सूचना काँग्रेसने अंमलात आणली पाहिजे, आंदोलनावरुन फडणवीसांची टीका, गांधी जयंती आंदोलनाचा नाही तर आत्मचिंतन करण्याचा दिवस असल्याचं मत