ABP Majha Headlines : 4 PM : 12 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सगळ्या मागण्या मान्य करा, मनोज जरांगेंनी थोपटले दंड, अडवणूक झाली तर उठाव करावाच लागेल असा इशारा.. 

काली माता बनून परत आलेय, पंकजांचा भगवान भक्तीगडावरून एल्गार, लोकसभेला हरले तरी थकले नाही असा निर्धार...

शिवाजी पार्कवर ठाकरेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी, निवडणुकीच्या तोंडावर मशाल पेटवणार..तोफेच्या तोंडी कोण कोण राहणार याची उत्कंठा.

आझाद मैदानावर एकनाथ शिंदेंच्या मेळाव्याची जय्यत तयारी, ठाकरे आणि मविआ राहणार शिंदेंच्या रडारवर..

ऐन दसऱ्याच्या दिवशी राज ठाकरेंची स्वबळाची घोषणा, मनसेला संधी द्या असं पॉडकास्टमध्ये आवाहन...तुमची प्रतारणा केलेल्यांना क्रांती घडवून धडा शिकवा असा सल्ला...

पाकिस्तान आणि बांग्लादेश एकत्र येऊन भारताला रोखू शकतात, सरसंघचालक मोहन भागवतांचं मत, हिंदूंनी सशक्त राहावं असं आवाहन...

एकनाथ शिंदेंनी अहमदाबादमध्ये मेळावा घ्यावा, तिथंच त्यांचा पक्ष जन्माला आला, संजय राऊतांची टीका, दिल्लीचे सत्ताधीश देश लुटत आहेत असा आरोप..

महाविकास आघाडीच्या पवार,ठाकरे आणि नाना पटोलेंनी बोलावली उद्या पत्रकार परिषद, जागावाटप जाहीर करणार का याची उत्कंठा..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram