ABP News

ABP Majha Headlines : 04 PM : 19 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

भाजपने शब्द पाळला नाही म्हणून शिंदे मुख्यमंत्री झाले नाहीत, खासदार संजय राऊत यांचा आरोप.. भाजप-शिवसेना युतीचं सरकार आलं असतं तर शिंदेच मुख्यमंत्री झाले असते, राऊताचा दावा

ऑपरेशन टायगर मोडून काढण्यासाठी ठाकरेंची शिवसेना सक्रिय, सर्व नेत्यांची शिवसेना भवनात दर मंगळवारी होणार आढावा बैठक,  नाराजांची बाजू समजून लवकरच संघटनात्मक बदल करण्याचा मानस

मंत्रिमंडळाच्या बैठकीआधीच अजेंडा लीक करणाऱ्यांची खैर नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा सज्जड दम... तर ठाकरे सरकारचा अजेंडा लीक करणारेच तुमच्या मंत्रिमंडळात, संजय राऊतांचा टोला...

चंद्रशेखर बावनकुळे धसांचे बॉस, त्यांनीच धसांना ट्रॅपमध्ये पकडलं का? संजय राऊतांचा संशय.. सर्व शिवसेना नेते लवकरच मस्साजोगला जाणार असल्याचीही राऊतांची माहिती 

मुंडे-धस भेटीमुळे देशमुख हत्या प्रकरणाच्या चार्जशिटमध्येही छेडछाडीची शक्यता, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप, भेटीसाठी भाजपने धसांवर दबाव टाकल्याचाही दावा

१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातला आरोपी अबू सालेमची माफी मागत मुदतपूर्व सुटकेसाठी हायकोर्टात याचिका, दहा मार्च रोजी याचिकेवर सुनावणी

किल्ले शिवनेरीवर दिमाखदार शासकीय शिवजयंती सोहळा,  मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची शिवरायांना मानवंदना

राजकोट किल्ल्यावर शिवछत्रपतीच्या नव्या पुतळ्यांची पायाभरणी संपन्न.. पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पायाभरणी, माजी मंत्री दीपक केसरकरही उपस्थित

शिवजयंतीनिमित्त राहुल गांधींच्या पोस्टवरुन नवा वाद, महाराजांची जयंती असताना वाहिली श्रद्धांजली, तर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांची आता शिवरायांपर्यंत मजल, भाजपसह, शिंदेंच्या शिवसेनेचा जोरदार हल्लाबोल

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram