ABP Majha Headlines : 02 PM : 08 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
दिल्लीत आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांचा धक्कादायक पराभव...भाजपचे परवेश वर्मा ठरले जायंट किलर...
दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांचा पराभव...मुख्यमंत्री आतिशी मात्र विजयी...आपचे अनेक दिग्गज पराभवाच्या छायेत...
दिल्लीतला आम आदमी पक्षाचा गड कोसळला...आतापर्यंतच्या कलानुसार २५ पेक्षा कमी जागा...गेल्यावेळच्या तुलनेत ४० जागा घटल्या...
अरविंद केजरीवालांचे विचार, चारित्र्य शुद्ध नसल्यानंच पराभव...अण्णा हजारेंनी फटकारलं...दारुच्या धोरणामुळे केजरीवाल बदनाम झाल्याचं मत...
दिल्लीत भाजपची मुसंडी...आतापर्यंतच्या कलानुसार भाजपला स्पष्ट बहुमत...तब्बल २७ वर्षांनंतर सत्ता स्थापनेची संधी...
दिल्लीच्या विजयानंतर भाजपचा देशभरात ठिकठिकाणी जल्लोष...पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी कार्यकर्त्यांशी साधणार संवाद...
भाजपकडून दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदासाठी हालचाली सुरू...परवेश वर्मा, बांसुरी स्वराज, स्मृती इराणी रिंगणात...
महाराष्ट्रानंतर दिल्लीकरांनीही मोदींच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास दाखवला, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया...असत्याचा पराभव आणि सत्याचा विजय झाल्याचं मत...
काँग्रेसला दिल्लीकरांनी पुन्हा नाकारलं...काँग्रेसच्या खात्यात एकही जागा नाही...दिल्लीकरांना आपलसं करण्यात काँग्रेस नेतृत्वाला अपयश...