Men's Day 2021 : International Men's Day निमित्त ABP माझाचा पुरुषांबाबत खास कार्यक्रम

महिला दिनी तुम्ही तुमच्या मैत्रिणीला, आईला, बहिणीला मेसेज पाठवून शुभेच्छा देता... पण आज तुम्हा पुरुषांना कुठला मेसेज आलाय का? कदाचित तुमच्याही लक्षात नसेल पण आज जागतिक पुरुष दिन आहे... त्यामुळे समस्त पुरुष वर्गाला हॅपी मेन्स डे.. आपल्या समाजातली स्त्रियांवरची बंधनं सर्वश्रृत आहेत.. किंबहुना काही बंधनांच्या साखळ्या त्यांनी मोडूनही काढल्यात.. पण पुरुष म्हंटलं की त्यांच्यावरही काही बंधन येतात.. त्यात पुरुष कधी रडत नाही? पुरुष वाद घालत नाहीत? पुरुष घरची कामं करत नाही? अशा दबावात भारतीय पुरुष असतो.. आणि आताच्या नव्या पिढीतल्या पुरुषांनीही सो कॉल्ड बंधन बाजूला सारलीयत.. आईची, बहिणीची धडपड.. त्यांचं दुःख.. त्यांची खटपट आपल्याला दिसते.. पण बाहेर राबराब राबणारे आपले वडील .. हट्ट पुरवणारा भाऊ.. घरातल्या गरजा भागवणारा नवरा यांच्या मनात कधी आपण डोकावून पाहिलं का?.. आणि त्यामुळेच जागतिक पुरुष दिनानिमित्त आम्ही पुरुषांना नव्हे तर त्यांच्याबद्दल महिलांना बोलतं केलं...  पाहुयात 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola