Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 30 सप्टेंबर 2021 : गुरुवार : ABP Majha

Continues below advertisement

1. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशला सोडल्याची तपास यंत्रणांना शंका, एनआयएच्या आरोपपत्रात परमबीर यांना अडचणीत आणणारे अनेक खुलासे

2. राज्यभरात मुसळधार पाऊस, मराठवाडा, विदर्भात पावसाचा हाहाःकार, शेतीचं नुकसाना, बळीराजा चिंतेत 

3. मुख्यमंत्री लवकरच मराठवाड्याच्या दौऱ्यावर, नुकसानग्रस्त घरांना 50 हजारांच्या मदतीची राज ठाकरेंची मागणी, तर ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी भाजप आग्रही 

4. 4 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या आठवी ते बारावीच्या शाळेसाठी मुंबई महापालिकेची नियमावली, तर आरोग्य विभागाच्या परीक्षेमुळे टीएटीईटीची परीक्षा 30 ऑक्टोबरला 

5. कामचुकार कंत्राटदारांना मुख्यमंत्र्यांचा गंभीर इशारा, खड्ड्यांसदंर्भात बोलावलेल्या बैठकीत मुख्यमंत्री आक्रमक, एबीपी माझाच्या वृत्तमालिकेला मोठं यश 

6. सोलापूर विमानतळासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचा प्रस्ताव वनविभागानं फेटाळला, 33.72 हेक्टर जमिन देण्यास नकार 

7. देहविक्रीसाठी पश्चिम बंगालमधील शेकडो मुली पुण्यात, मोठं रॅकेट कार्यरत, मुलींना पुण्यात आणण्यासाठी एजंटला 25 ते 30 हजारांचं कमिशन

8. बिबट्याचा हल्ला परतवून लावणाऱ्या 64 वर्षीय महिलेची दृश्य सीसीटीव्हीत कैद, मुंबईतील आरे कॉलनीतील घटना, बिबट्याचा बंदोबस्त करण्याची रहिवाशांची मागणी 

9. पंजाबमधील कलहानंतर जी 23 गटातील नेतृत्त्वाचा काँग्रेस नेतृत्त्वाला सवाल, राहुल आणि प्रियंका गांधींच्या कार्यशैलीवर अप्रत्यक्ष निशाणा 

10. आयपीएलमध्ये बंगळुरुचा राजस्थानवर 7 गडी राखून विजय, मॅक्सवेलचं अर्धशतक, राजस्थानची प्लेऑफची आशा धुसर 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram