Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 29 ऑक्टोबर 2021 : शुक्रवार : ABP Majha

Continues below advertisement

1. क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी जामीन मिळाल्यानंतर आर्यन खानची आज तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता, मन्नतबाहेर शाहरुखच्या चाहत्यांचा जल्लोष
 
2. क्रूझ पार्टी आयोजक काशिफ खान यांच्यावर समीर वानखेडेंनी कारवाई करू दिली नाही, मलिक यांचा आरोप, वानखेडेंवर तूर्त कठोर कारवाई न करण्याचे न्यायालयाचे निर्देश

3. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरुद्ध ठाण्यातील न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट, खंडणीच्या गुन्ह्याप्रकरणी अटक करून न्यायालयात हजर करण्याचे आदेश

4. फोन टॅपिंगचा अहवाल फडणवीसांनी नव्हे तर आव्हाड आणि मलिक यांनी उघड केला, रश्मी शुक्लांचा न्यायालयात दावा, तर सीबीआयकडून अधिकाऱ्यांचं खच्चीकरण, राज्य सरकारचा कोर्टात आरोप 

5. एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन मागे, 28 टक्के महागाई भत्ता आणि वाढीव घरभाडे भत्ता देण्याच्या मागण्या सरकारकडून मान्य

6. दोन दिवसांपासून बुलढाणा अर्बन पतसंस्थेच्या मुख्यालयात आयकरच पथक ठाण मांडून, अशोक चव्हाणांशी संबंधित कारखान्यांना दिलेल्या कर्जाप्रकरणी चौकशी सुरु

7. मुंबईतील कफ परेडच्या झोपडपट्टी पुनर्विकासासाठी एक पाऊल पुढे, नौदलाकडून एनओसी घेण्यासाठी विकासकाचे प्रयत्न, 70 हजार झोपडपट्टीवासियांचं जीवन पालटणार असल्याचा दावा

8. मुंबै बँकेची चौकशीविरोधातली याचिका हायकोर्टानं फेटाळली, प्रवीण दरेकर यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं

9. उगवत्या सूर्याच्या साक्षीनं कॅडेट्स बनले अधिकारी, पुण्यात एनडीएच्या 141व्या तुकडीचं दीक्षांत संचलन, खडतर प्रशिक्षण पूर्ण करुन अधिकाऱ्यांची नवी फौज देशसेवेसाठी सज्ज

10. फेसबुक आता मेटा नावानं ओळखलं जाणार, लोगोमध्येही बदल,  रिब्रॅण्डींगच्या उद्देशाने मार्क झुकरबर्ग यांची घोषणा

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram