Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 06 जून 2021 | रविवार | ABP Majha

Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 06 जून 2021 | रविवार | ABP Majha

1. शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त राज्यभर शिवस्वराज्य दिन साजरा करण्याचा सरकारचा निर्णय, सरकारी कार्यालयांबाहेर शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारणार

2. सुमारे 350 वर्षांनी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त 'सुवर्ण होणांनी' अभिषेक, शिवराज्याभिषेक दिनानिमित्त 'होन' सुपूर्द होणं हा सुवर्ण क्षण, खासदार संभाजीराजे भोसलेंचं वक्तव्य

3. राज्य सरकारला दिलेला अल्टिमेटम संपला, खासदार संभाजीराजेंच्या मराठा आंदोलनाची दिशा आज ठरणार, शिवराज्याभिषेकासाठी रायगडावर गर्दी न करण्याचं आवाहन

4. निर्बंध शिथिल करताना महाराष्ट्राची 5 गटांत विभागणी, दुकानांच्या वेळा वाढवल्या, 20 टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट असलेल्या जिल्ह्यांत निर्बंध कायम

5. राज्यात शनिवारी 13,659 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, पाच जिल्ह्यांमध्ये अॅक्टिव्ह रुग्ण एक हजारहून कमी

6. सर्वसामान्यांना मुंबई लोकलमध्ये एन्ट्री नाही,  पुढच्या आठवड्यात ई-पास विना आंतरजिल्हा प्रवास करणं शक्य

7. पुणे महापालिकेची अनलॅाक नियमावली जारी; दुकाने, हॉटेल चार वाजेपर्यंत खुली तर सलून, उद्याने, जीम उघडणार

8. सलग आठव्या महिन्यात 1 लाख कोटीहून अधिक जीएसटी कलेक्शन; गेल्यावर्षीच्या तुलनेन 65 टक्के अधिक

9. कोलकात्यात भाजप कार्यालयाबाहेर 51 देशी बॉम्ब आढळल्यानं खळबळ, तपास सुरु, बॉम्ब पेरणाऱ्यांना शोधून काढण्याचं आव्हान

10. हवामान खात्यानं वर्तवलेल्या वेळापत्रकापूर्वीच मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन, येत्या काही तासांत मान्सून महाराष्ट्रभर व्यापणार

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola