Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 3 एप्रिल | शनिवार | ABP Majha

Continues below advertisement

1. राज्यात कोरोना परिस्थिती गंभीर, शुक्रवारी तब्बल 47 हजार 827 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ

2. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कायम राहिल्यास लॉकडाऊन अटळ, मुख्यमंत्र्यांचा 2 दिवसांचा अल्टिमेटम

3. लॉकडाऊनऐवजी सुविधा वाढवण्याचा सल्ला देणाऱ्या महिद्रांना मुख्यमंत्र्यांचा टोला, मास्क न घालणाऱ्या राज ठाकरेंनाही चिमटे

4. पुणेकरांनो कामाशिवाय घराबाहेर पडू नका! पुण्यात आजपासून सात दिवस मिनी लॉकडाऊन

5. पुण्यातल्या मिनी लॉकडाऊनला व्यापारी महासंघाचा विरोध, तर PMPML बंद ठेवण्याच्या निर्णयाविरोधात भाजप रस्त्यावर उतरणार

6. 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना घरी जाऊन लस द्या, मुंबई उच्च न्यायालयात याचिका, तातडीनं सुनावणी घेण्याची मागणी

7. पालघर जिल्ह्यातील शाळा 5 एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत बंद, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

8. मुंबईतील पवईत चोरीच्या संशयातून 17 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण, लोखंडी रॉडचा मारल्यानं तरुणाचा मृत्यू, 4 जणांना अटक

9. देशाचा परकीय चलन साठा तब्बल 2.986 अब्ज डॉलरने घसरला, RBI च्या अहवालातून स्पष्ट

10. रुग्णालयात भीषण आग लागली असतानाही डॉक्टरांकडून रुग्णावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया, देवदूत ठरलेल्या रशियातल्या डॉक्टरचं जगभरातून कौतुक

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram