Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 25 फेब्रुवारी 2021 | गुरूवार | एबीपी माझा

1. अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 दिवसांवर, मात्र विधानसभाध्यक्षपदांचं नाव अद्याप निश्चित न झाल्यानं मुख्यमंत्र्यांसमोर नवा पेच, काल वर्षावरच्या बैठकीनंतर आज पुन्हा खलबतं

2. पोहरादेवीतल्या शक्तिप्रदर्शनानंतर टीकेचे धनी ठरलेल्या संजय राठोडांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, चर्चेचा तपशील गुलदस्त्यात

3. एक मार्चपासून ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर आजार असलेल्या 45 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण, सरकारी केंद्रावर मोफत लस मिळणार

4. महाराष्ट्रात 8 हजार 807 नवे कोरोनाबाधित तर मुंबईत 1 हजार 167 रुग्णांची वाढ; सोलापूर, साताऱ्यात संचारबंदी,महारष्ट्रातून तीन राज्यात जाण्यासाठी निर्बंध

5. मास्क न घातल्यास समुद्र किनाऱ्यावर झाडू मारावा लागणार, कोरोनाच्या संकटात हलगर्जीपणा दाखवणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी मुंबई महापालिकेची शक्कल

6. 24 तासांत राज्यातल्या अनेक शहरांच्या तापमानात मोठी वाढ, अनेक ठिकाणी सरासरी 36 अंश तापमानाची नोंद

7. येत्या काही महिन्यांत मुंबई ते नवी मुंबई जल वाहतूकीला सुरुवात, मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अध्यक्षांची माहिती

8. वसईत भात गिरणी मालकाला दोन महिन्यांचं तब्बल 80 कोटीचं वीज बिल, चूक लक्षात येताच महावितरणकडून दुरुस्ती

9. अमेरिका, ब्रिटन 2021 पर्यंत हर्ड इम्युनिटी प्राप्त करतील पण युरोपियन युनियन अद्याप दूर, स्टॅटिस्टाचा अहवाल

10. काल गोलंदाजांनी दिवस गाजवल्यानंतर आज फलंदाजांच्या कामगिरीकडे लक्ष, भारतीय फिरकीपुढे इंग्लंडचं लोटांगण, अवघ्या 112 धावात पाहुण्यांचा संघ तंबूत माघारी

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola