ABP Majha चे वरिष्ठ वृत्तनिवेदक अश्विन बापट यांच्या पुस्तकाचं मुंबईत प्रकाशन, अनेक मान्यवर उपस्थित

एबीपी माझाचे वरिष्ठ निर्माता आणि वरिष्ठ वृत्तनिवेदक अश्विन बापट यांनी लिहिलेल्या माझी लेखंदाजी... मुशाफिरी खेळातली, थरार मैदानातला या पुस्तकाचं आज विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आलं. एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर, ज्येष्ठ कवी नितीन तेंडुलकर, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कुलकर्णी, ज्येष्ठ सिनेपत्रकार दिलीप ठाकूर आणि एबीपी माझाच्या संपादक सरिता कौशिक यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचं प्रकाशन संपन्न झाला. हा कार्यक्रम मुंबई मराठी पत्रकार संघात पार पडला. नाविन्य प्रकाशन आणि ओढ हिरवळीची या संस्थांनी मिळून या पुस्तकाची निर्मिती केली आहे. क्रीडा, संगीत, चित्रपट, अर्थ या विषयांसह मुंबईतल्या मराठी संस्कृतीत अश्विन बापट यांना असलेल्या अभ्यासपूर्ण रुचीचं राजीव खांडेकर यांच्यासह प्रमुख वक्त्यांनी कौतुक केलं. यापुढच्या काळात त्यांनी आपल्या आवडीच्या विषयांवर अधिकाधिक लिखाण करावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola