ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 05 March 2025

ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 05 March 2025

समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमींना औरंगजेबाची स्तुती भोवली...आझमींची आमदारकीच रद्द करा, मुनगंटीवार आणि नितेश राणेंची मागणी...विधानसभेत जोरदार खडाजंगी... 

कोरटकर, सोलापूरकरवर कारवाई कधी विरोधकांचा सवाल...तर पंडित नेहरूंनी डिस्कव्हरी ऑफ इंडियात शिवरायांचा अवमान केला, त्याबद्दल माफी मागणार का, फडणवीसांचा पलटवार...

विधीमंडळ नीट चालण्यासाठी निलंबन झालं असेल तर हरकत नाही, अबू आझमीचं स्पष्टीकरण.. वादग्रस्त किंवा ऐतिहासिक दाखले नसलेलं काहीच बोललो नसल्याचा दावा, न्यायासाठी संघर्ष करण्याचा निर्धार.

आझमींना उत्तर प्रदेशला पाठवा, उपचार करू, योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल...तर निलंबन करून तुम्ही सत्याचा आवाज दाबू शकत नाही, अखिलेश यादवांचा पलटवार.

लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी देणार, विधान परिषदेत सतेज पाटील, अनिल परबांचा सरकारला सवाल...या अर्थसंकल्पात देऊ असं म्हटलं नव्हतं, आदिती तटकरेंचं स्पष्टीकरण...

विधान परिषदेत उपसभापती नीलम गोऱ्हेंविरोधात मविआकडून अविश्वास ठराव.. अविश्वास ठराव आणायला उशिरा झाला, गोऱ्हेंचं निलंबनच व्हावं, उद्धव ठाकरेंची मागणी

कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंना मोठा दिलासा, नाशिक सत्र न्यायालयाकडून शिक्षेला स्थगिती, अपील सुरु असेपर्यंत आमदारकीवरचं संकट दूर

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola