ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 23 January 2025

Continues below advertisement

सकाळी ९ च्या हेडलाईन्स ABP Majha Marathi News Headlines 9AM  Maharashtra politics

जळगाव रेल्वे दुर्घटनेतील मृतांचा आकडा १३, नऊ जणांची ओळख पटली.. मृतांमध्ये दहा वर्षाच्या बालकाचा समावेश..अपघातात २५ प्रवासी गंभीर जखमी, रेल्वेच्या सुरक्षा आयुक्तांमार्फत होणार चौकशी

जळगावमध्ये पुष्पक एक्स्प्रेसमधील प्रवाशांच्या आगीच्या अफवेनंतर ट्रेनमधून उड्या, समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसची रुळावरील प्रवाशांना धडक

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज शिवसेनेचे दोन मेळावे, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली अंधेरीत महामेळावा, तर बीकेसीत शिंदेंच्या शिवसेनेचा विजयोत्सव

बाळासाहेब ठाकरेंची आज जयंती, मुंबईत रिगल सिनेमा जवळ बाळासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला उद्धव ठाकरेंचं अभिवादन, बाळासाहेबांच्या पुतळ्याजवळ आकर्षक विद्युत रोषणाईसह फुलांची सजावट.

न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर वाल्मिक कराडवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू....रात्री पोटदुखी आणि अस्वस्थ वाटू लागल्यानं कराडवर आयसीयूमध्ये उपचार

राज्यात गुंतवणूक आणणाऱ्या तब्बल सोळा लाख कोटींच्या पन्नासपेक्षा जास्त सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या.. दाओस व्यापार परिषद आटोपून उद्योग मंत्री आज मुंबईत परतणार, विमानतळावर स्वागताची जय्यत तयारी

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram