ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 18 April 2025
ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 18 April 2025
यवतमाळमध्ये पाणी भरण्यासाठी गेलेल्या १२ वर्षीय मुलीचा नदीत बुडून मृत्यू...पाईपलाईन असून पाणी नाही, हॅण्डपंपही धूळखात, काठोडा पारधी बेड्यात पाण्याचं दुर्भिक्ष्य
पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला मराठी भाषा सुकाणू समितीचा विरोध, हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा शासन निर्णय मागे घ्यावा, सुकाणू समितीतील सदस्य रमेश पानसेंची मागणी
मराठी माणसाच्या मुळावर येणारा विकास नको, मुलाखतीत राज ठाकरेंचं सडेतोड उत्तरं, केवळ सोहळे करुन आणि अभिजात दर्जा देऊन मराठी जिवंत राहणार नसल्याचंही मत
निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले बीड पोलिसांच्या ताब्यात, पुण्यात मुक्काम असलेल्या हॉटेलमधून पकडलं, पोलिसांना शरण येण्याआधीच कासलेला घेतलं ताब्यात
बाळासाहेबांच्या आवाजाची नक्कल म्हणजे पोरकटपणा आणि उबाठेपणा, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल...स्वतःचं पाप झाकण्यासाठी आणि लोकांची दिशाभूल करण्यासाठी कृत्य केल्याचा आरोप...
राज्यातील शालेय शिक्षकांना ड्रेसकोड लागू होणार, मालेगावात शिक्षणमंत्री दादा भुसे यांची माहिती, शासननिधी उपलब्ध करुन देणार असल्याचेही सूतोवाच