ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11AM 16 August 2024

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11AM 16 August 2024

महाविकास आघाडी करणार प्रचाराचा श्रीगणेशा, मुंबईत षण्मुखानंद सभागृहात मेळावा, उद्धव ठाकरे, शरद पवार, पटोले, थोरातांसह सर्व मविआ नेत्यांची उपस्थिती

अजित पवार घरातल्या घरातच कुस्ती करणार...  संजय राऊतांचा निशाणा....तर  लोकसभेला पिळून काढल्यानंतर आता अजित पवारांना बारामतीत रस राहिला नाही राऊतांचा हल्लाबोल

भाजपचे खासदार नारायण राणेंना मुंबई हायकोर्टाची नोटीस....राणेंची निवड रद्द ठरवण्याच्या  विनायक राऊतांच्या याचिकेसंबंधी नोटीस

वादग्रस्त वक्तव्यप्रकऱणी रामगिरी महाराजांवर गुन्हे दाखल....मुख्यमंत्री रामगिरी यांची भेट घेणार का? याकडे लक्ष

कोलकातातील घटनेच्या निषेेधार्थ राज्यभरात डॉक्टरांचं आंदोलन... नायर रुग्णालयाबाहेर डॉक्टरांचं आंदोलन तर नागपुरातही डॉक्टरांचा संप सुरूच

इंडियन मेडिकल असोसिएशनने पुकारला देशव्यापी संप, उद्या सकाळी ६ ते शुक्रवारी सकाळी ६ पर्यंत राहणार ओपीडी बंद..

कोलकाता डॉक्टर बलात्कार हत्या प्रकरणाच्या निषेधात आता बॉलिवूडचीही उडी, आयुष्मान खुराणा, ऋतिक रोशन, कृती सेननकडून सोशल मीडियावर नाराजी

आजपासून राज्यभरातील ग्रामपंचायतींना कुलूप बंद आंदोलन, सरपंच संघटना करणार आंदोलन, १५ लाखांपर्यंतच्या विकासकामांवर कात्री आणल्याने नाराजी

जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीची आज घोषणा होणार, दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, हरियाणा विधानसभेच्या तारखाही जाहीर होण्याची शक्यता

गेमिंग अॅपशी संबंधित गैरव्यवहार प्रकरणात ईडीकडून चौघांना अटक....घोटाळ्याचं चीन कनेक्शन असल्याचा संशय

जगभरात मंकीपॉक्स आजाराचं थैमान... ७० हून अधिक देशात मंकी पॉक्सचा फैलाव...अकराशेहून अधिक नागरिकांचा मृत्यू

पंतप्रधान मोदी पुढील महिन्यात अमेरिका दौऱ्यावर, २६ सप्टेंबरला संयुक्त राष्ट्र महासभेच्या सत्रात बोलणार मोदी

इस्रोने आज पुन्हा इतिहास रचला, पृथ्वी निरीक्षण उपग्रह झेपावला, मोहीम यशस्वी, इस्रोची घोषणा

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram